Translate

दोडका लागवड माहिती व व्यवस्थापन,dodka lagvad mahiti ani vyavasthapan

 दोडका लागवड ,dodka lagvad ani vyavasthapan

दोडका लागवड  करताना चांगला निचरा होणारी मध्यम काळी जमीन निवडावी .




सुरुवातीला शेणखत 10 ते 15 टन  टाकावे ,दोडक्याच्या सुधारित , व चांगल्या जातीची निवड करावी.

लागवडीसाठी साधारण एकरी एक किलो बियाणे पुरेसे असते. बियाण्याची निवड करताना उच्च कंपन्यांची बियाणे निवडावे.

Dodka seeds (ridge seeds):- Us 6001,vnr arti ridge ground, Ankur Latika ridge, Naga f1,vnr F1,mahyco mhrg7,  kokan harita , fule sucheta etc.

या सर्व दोडक्याच्या हायब्रीड बेस्ट जाती आहेत.आपण आपल्या जमिनी व लागवड कालावधीनुसार योग्य ती जात निवडावी.

साधारण पावसाळी लागवड ही जून ,जुलै मध्ये व उन्हाळी लागवड ही जानेवारी, फेब्रुवारी मध्ये करावी .

लागवडी अगोदर रोटर मारून जमीन चिकन करून घ्यावी व bed साधारण सरी वरंबा पद्धतीने 4 ते 5 ft अंतर ठेऊन पाडावेत. 

मंडप पद्धत मध्ये 8*5ftअंतर ठेवा.

Bed पाडते वेळेस 18:46:00 50kg+निबोळी पेंड 100kg+urea 50kg+सुफरफॉस 100kg भोतावर टाकून द्यावे .  Drip irrigation system टाकून घ्यावी व नंतर Mulching paper फिटीग करून घ्यावा.

सरीतल अंतर 5ft असेल तर रोपातील अंतर 3ft धरून लागवड करावी.

दोडका लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.

लागवडी अगोदर बियाण्यास captan  किंवा कार्बेन्डझिम 2.5gm per kg बियाणे स चोळावे.

लागवीपूर्वी भरपूर पाणी देऊन घ्यावी व वाफसा आल्यावर लागवड करावी.

पिकाचा कालावधी हा 140 ते 160 दिवसाचा असतो.

पिकावरील डावणी  व केवडा या रोगास  नियंत्रणात आणण्यासाठी पावसाळी वातावरणात m45 500gm+mz72 500gm 200लिटर पाणी स्प्रे घ्यावा.

किंवा melody duo 600gm acre spray घ्यावं.

Black spot(काला करपा): copper ऑक्सिक्लोराईड 25gm 10लिटर पाणी मिसळून स्प्रे घ्याावंं.

आलटून पालटून m45 किंवा captan किंवा क्लोरोथ्यालोलिन

यांचा   25gm 10लिटर पाणी या प्रमाणात स्प्रे घ्यावा.

या मुळे पानावरील काला करपा पण आटोक्यात येतो .

भुरी:   

Luna 100ml  acre अती भुरी असेल तर सकाळी 9 वाजता स्प्रे घ्यावा . सिस्टमेक औषधे ऊन्हात स्प्रे करावा .

Contac औषधे कॉनटॅफ,डीनोकॅप यांच्या 1gm 1liter पाणी या प्रमाणात स्प्रे आलटून पालटून फवारावे.

पांढरी माशी फुलकिडे मावा: फुलकिडे पांढरी माशी पानांतील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात. हे कीटक विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात. यांचे नियंत्रणासाठी confidor किंवा oberon किंवा karbosalfan 10ml 15लिटर पाणी मिसळून स्प्रे घ्यावा.

नागआळी: पानाच्या खालच्या बाजूस आता मधे जाऊन आतील भाग खाते व त्यांच्या मुळे नागमोडी वळण पानावर दिसते.

यांच नियंत्रण साठी oberon ,corogen,abacin,etc. योग्य प्रमणातच घेऊन स्प्रे घ्यावा.

अळी :असेल तर ampligo,proclem,corogen,deliget,fem, या औषधाचा वापर योग्य प्रमाण घेऊन स्प्रे घ्यावा.

Liqvid खते: सुरवातीच्या काळात 19:19:19 वेल वाढेपर्यंत द्यावी. कळीची सेटिंग  झाल्यावर 12: 61:00 एकरी तीन ते चार किलो या प्रमाणात द्यावी.

फळ तोडणी सुरुवात झाल्यावर 12 61 व 00:60:20 ,13:00:45 या लिक्विड खतांच्या मात्रा सुरू कराव्यात.

4 ते 5kg acre  या प्रमाणात खते द्यावे.







कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.