Translate

दुधी भोपळा लागवड,PUMPKIN planting marathi mahiti.

दुधी भोपळा लागवड,(bhopla lagwad kashi karavi)PUMPKIN planting marathi mahiti.

दुधी भोपळा लागवड कशी करावी(PUMPKIN PLANTING )

भोपळा लागवडीसाठी मध्यम काळी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन

 अतिशय योग्य असते.

पाच ते दहा टन शेणखत प्रति एकरी मातीत मिसळून द्यावे. 

लागवडी शकतो जून-जुलै आणि उन्हाळी लागवड जानेवारी-फेब्रुवारी करावी.

लागवडीपूर्वी नत्र/ स्फुरद/ पालाश प्रती 25/25/25 किलो व लागवडीनंतर एक

 महिन्याने 25 किलो प्रति एकरी नत्राची मात्रा द्यावी.

लागवडीचे अंतर साधारण मंडप पद्धतीमध्ये नऊ फूट गल्लीतील अंतर व रोपातील
 अंतर 4 फूट असावे.

साधारण 400 ते 500gm बियाणे एकरी पुरेशी असते.

लागवडीसाठी बियाणे महिको कंपनीचे वरद हे वान उत्कृष्ट प्रतीचा असून हिरवट पोपटी 30 ते 40 सेमी लांबीचा असतो. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार भरपूर उत्पादन या वानाने दिलेले आहे .

लागवडीअगोदर बीज प्रक्रिया करताना  कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम 2gm बियाण्यास चोळावे.

लागवड झाल्यानंतर बियाणे उगवून आल्यास वेलीची वाढ बांबूच्या साह्याने वाढवत बगल फूट  काढून वेल मंडप वर सिंगल पद्धतीनें न्यावी. 

सुरुवातीच्या काळात कीटकांपासून रक्षणासाठी कॉन्फिडोर(confidor ) सुपर प्रति पंपास 5ml spray ghyava 
किंवा फोसेटील 20 ग्रॅम+ मॅन्कोझेब 20 ग्रॅम.

केवडा किंवा डाऊनी दिसल्यास मेलीडीओ /copper, blue  copper   स्प्रे घ्यावा. 
करपा आलेली पाणे खराब झालेली पाणे काढत रहावी. कळीला सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. 

दुधी भोपळा लागवड,PUMPKIN planting marathi mahiti.

सुरुवातीच्या काळात काळा टिक्का,  काळा करपा (anthraconoj) दिसल्यास 
करपा दिसुन येत असल्यास स्थानिक उघडिप पाहुन मेटॅलॅक्झिल मॅंन्कोझेब या संयुक्त बुरशीनाशक3gm/Lने फवारणीचे नियोजन करावे.

 मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड, 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून

 फवारणी करावी.

मावा किड दिसुन आल्यास इमिडाक्लोप्रिड 0.4ml/Lने फवारणी करावी

सुरुवातीच्या पानावरील भुरी दिसल्यास contaf/carbendajim पाच ते दहा ग्रॅम 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

22-26Cतापमानात भुरी,लालकोळीच्या एकत्रितनियंत्रणास गंधक योग्य मात्रा फवारणी फायदेशीर..

पांढरी
 माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. प्रतिबंध करण्यासाठी 2Ltr गोमुत्र+ 2Ltr

ताक/15Ltr पाण्यात मिसळून 8-10दिवसाच्या अंतराने दोनदा फवारा

  पांढरी माशी दिसून येताच नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20
 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट

 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6
 ml/15 Ltr पाण्यातून फवारा

नाग आळी ही पानाच्या आत मध्ये राहते पाणाचा आतला भाग खाते त्यामुळे पानांवर

 नागमोड आकाराच्या नागमोडी रेषा दिसतात त्याच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क

 चार टक्के किंवा oberon 8m प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
PUMPKIN planting marathi mahiti.

अळी दिसून येताच ampligo  १०० ml  २०० liter पाणी  + kuman L  ५०० ml  यांची फवारणी घ्यावी.

सुरुवातीच्या काळात वाढ योग्य होत असल्यास वर खताच्या मात्रा कोणते देऊ नये.
साधारण वेल मंडप वर गेल्यावर 12: 61: 00 लिक्वीड आणि कळीची सेटिंग सुरू झाल्यावर 00:52:34 पाच दिवसाच्या अंतराने देत रहावे.

दुधी भोपळा हा आती पावसासाठी नाजूक आहे, जास्त पाऊस चालू राहिल्यास कळी गळ होते. कळीची जर गळ होत असेल तर बोरान १००gm+0:52:34 500gm +200liter पाणी यांचा स्प्रे घ्यावा.
नत्राचे जास्त प्रमाण,स्फुरद,पालाश,कॅल्शिअम,बोरॉन कमतरतेने कुज/गळ वाढते

पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. अति पाणी साचून राहिल्यास  मुळे खराब होतात व अन्नद्रव्यांची उचल कमी होऊन पाने पिवळी पडतात . 
मुळाजवळ पाणी साचुन राहिल्यास जमिनीत वायुविजन कमी होते,अन्नद्रव्यांची उचल घटते आणि पाने पिवळी पडतात. म्हणून लागवड सरी वरंबा पद्धतीवरच करावी.

खुडा करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध आहेत त्या प्लास्टिक मध्येच दुधीभोपळा टाकावा व नंतर खुडावे. म्हणजे फळांना खराब होणार नाही.
फळ खुडणीला सुरुवात झाल्यावर दररोज फळ काढणीस येते. 
फळांची योग्य ती प्रतवारी करून फळ मार्केटला कॅरेट मध्ये न्यावे.
कॅरेट मध्ये फक्त अठरा फळे टाकली जातात.


कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.