Translate

शेतात खतांची मात्रा अणि ph कसा मेंटेन करावा या विषयी कही थोड़ी माहिती, MARATHI SHETIVISHYAK MAHITI PH .... mhanje kay & liqued khatanchi mahitiMARATHI SHETIVISHYAK MAHITI PH mhanje kay & liqued khatanchi mahiti

  शेतात खतांची मात्रा  अणि ph  कसा मेंटेन करावा या विषयी कही थोड़ी माहिती, MARATHI SHETIVISHYAK MAHITI PH .... mhanje kay & liqued  khatanchi mahiti

   शेतात खतांची मात्रा  अणि ph  कसा मेंटेन करावा या विषयी कही थोड़ी माहिती ;

 १९;१९;१९, २४;२४ ;०० , npk   ०;५२;३४, १२;६१;००,etc ..... 

*PH म्हणजे 🧪काय :-❓*

*फवारणीच्या 💦पाण्याचा सामू (pH)🔰 किती असावा.?.
           
            
PH हा शेतीसाठी व आपल्या दैनदिन जीवनासाठी खुप महत्वाचा आहे. 

कारण PH मुळे हे समजते की, रसायन हे ॲसिडीक आहे किंवा नॉनॲसिडीक आहे.

 आपल्याला ॲसीडीटी झाली होती तेव्हा आपली परिस्थिती काय झाली होती हे आपल्यालाच माहिती.

 पण याचा अर्थ असा नव्हे की, नॉन ॲसिड चांगले आहे. कारण सजीवांच्या जीवनासाठी ठराविक स्तरापर्यंत क ळते ॲसिड हि महत्वाचे आहे.

 म्हणजेच आपल्याला हे समजले पाहिजे की, *ॲसिड व नॉन ॲसिड कसे ओळखायचे व हे मोजायचे मापक म्हणजे*

     
 *PH =*
Potential of Hydrogen,
 ( संभाव्य हायड्रोजन.....)

 *हायड्रोजन :-*
 हे रसायन शास्त्रामध्ये Positive व Negative चार्ज मोजण्यासाठी वापरतात.....

 *PH ची व्याख्या* अशी करता येऊ शकते की, “ *PH हे नंबरांचे प्रमाण आहे.

 ते दाखवते द्रव्याचे ॲसिड व नॉन ॲसिड गुणधर्म* " हे नंबर 1 ते 14 मध्ये मोजले जातात.

 जर नंबर 7 पेक्षा कमी आले.

 तर ते द्रव्य ॲसिड मानले जाते. व जर ते नंबर 7 पेक्षा जास्त आहे तर ते नॉन ॲसिड मानले जाते. व 7 ही संख्या तटस्थ मानली जाते.....
           
नैसर्गिक पाण्याचा *PH :- 7* असतो. व तो तटस्थ मानला जातो. म्हणजेच ॲसिड पण नाही आणि नॉन ॲसिड पण नाही.

PH जसे शेतीसाठी महत्वाचे आहे तसेच औषधशास्त्र, खाद्यशास्त्र, शरीरशास्त्र, पर्यावरण शास्त्र, बांधकाम शास्त्र या सर्वासाठी महत्वाचे आहे.....

*संख्यावरून साधारण पणे खालील प्रकार पडतात......*

3.5 :- जहार ॲसिड....

3.5 - 4.4 :- अत्यंत अॅसिडिक....

4.5 - 5.0 :- अतिशय जोरदार अॅसिड...

5.1 - 5.5 :- जोरदार अॅसिड.....

5.6 - 6.0 :- माफक अॅसिड.....

6.1 ते 6.5 :- किंचित अॅसिड.....

6.6 - 7.3 :- तटस्थ (नैसर्गिक)......

7.4 - 7.8 :- किंचित नॉन अॅसिड....

7.9 ते 8.4 :- माफक नॉन अॅसिड.....

8.5 - 9.0 :- जोरदार नॉन अॅसिड.....

9 :- अतिशय जोरदार नॉनअॅसिड...

PH खूप महत्वाचा विषय आहे..

           
फवारणीसाठी पाण्याचा *सामू (ph) जास्त महत्वाचं असतो *टीडीएस नाही*.

कोणतेही औषध मारताना जवळपास 1% औषध व 99% पाणी च आपण फवारणी करतो अशा वेळी पाणी जर योग्य गुणवत्तेचे नसेल तर फवारणीचा फारसा फायदा होनार नाही.....

 :- फवारणीचा चांगला / अपेक्षित असा रिझल्ट न मिळणे.......
:- फवारणीमधील बुरषीनाषक पावडर ची थाळ (थर) टाकीच्या खालील भागात फवारणी नंतर शिल्लक राहणे.....

:- औषधे एकसारख्या प्रमाणात पाण्यात मिक्स न होणे. इत्यादी लक्षणे हे आपल्या फवारणीच्या पाण्याचा सामू अधिक असण्याचे आहेत.....


 _*फवारणी साठी पाण्याचा सामू हा 5-7 इतपत असावा....*_
लिंबाचा रस/ सायट्रिक ऍसिड ने ph कमी करुन आपण सामू कमी करण्याचा प्रयत्न करतो पन आपल्याला ph कमी नाही करायचा

तर बॅलंस करायचा आहे
कारण आपण लिंबू सायट्रिक ऍसिड ने ph कधी बॅलंस नाही होत तर तो कमी होतो कमी झालेला ph हा आम्लधारी  मानला जातो तर तो सामू बॅलन्स च  पाहिजे कमी झालेले ph मध्ये तुम्हाला 100% औषधाचा रिझल्ट मिळणार नाही

*सामू बॅलन्स करण्याची औषधे वापरताना फवारणीच्या पाण्यात आधी सामू बॅलन्स  करणारे औषध टाकून पाण्याचा सामू बॅलन्स  करावा व मग नंतर फवारणीचे औषधे टाकावीत.

 बऱ्याच वेळा शेतकरी ph  बॅलन्सर फवारणीचे औषधे टाकल्यावर टाकतात मग औषधे फुटण्याचे (वाया जाण्याचे) प्रमाण दिसते व मग पूर्ण बॅरेल ओतून द्यावा लागतो......* _त्यामुळे ph कमी करणारी औषधे वापरताना एवढी गोष्ट नक्की लक्षात ठेवावी......._
*
🌱
*NPK:- नत्र-स्फुरद-पालाश*

*19:19:19:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी*


*12:61:00:-फुटवा जास्त येण्यासाठी*

*18:46:00:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी*

*12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी*

*10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी*

*00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी*

*00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.*

🌿 **कृषिमाहीती*  🌿

*हे माहीत आहे का?*

मित्रानो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज जाणून घेऊ
*विद्राव्य खतांचे कार्य...*

🌿 *१९:१९:१९, २०:२०:२०*
या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही _स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो._

🌿 *१२:६१:०*
या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.

तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. _

नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो._

🌿 *०:५२:३४*
या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. 

*_फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते._*

🌿 *१३:०:४५*
या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. _

फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.

अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात._

🌿 *०:०:५०+१८*
या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. 

_पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले अशकते.या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते._

🌿 *१३:४०:१३*

पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते
व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

🌿 *कॅल्शियम नायट्रेट -​*
मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

🌿 *​२४:२४:०*
यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.