watermelon planting in india , तरबूज लागवड माहिती अणि रोगनियंत्रण

Ticker

6/recent/ticker-posts

watermelon planting in india , तरबूज लागवड माहिती अणि रोगनियंत्रण

 watermelon planting in india , टरबूज  लागवड  माहिती  अणि रोगनियंत्रण.

  watwermelone [tarbooj] lagvad mahiti,tarbuj lagvad,ani vyavasthapan.tarbuj lagvad in maharastra , nashik  . sugger quene , nunhemse , kiran , sagar king, zebra 9 , etc . या नामांकित कंपन्यांच्या टरबूज बियाण्यांच्या काही व्हरायटी आहेत. तसेच आता नवीन आलेल्या मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या वरायटी उपलब्ध आहेत पण मी शक्यतो शुगर क्वीन याच वाणाची लागवड केली होती. 

watermelene planting in india 
  watwermelone [tarbooj] lagvad mahiti ani vyavasthapan.

नमस्कार  शेतकरी मित्रानो 

 तरबूज लागवड ही मि जवळपास ५ ते ६ वर्षापासून करतो  आहे अणि त्यात माला भरपूर अनुभव देखील अलेला आहे.  माझी शेती ही नाशीक नजिक आहे.  त्यामुळे आमचे हवामान सर्वच पिकाना  अनुकूल आहे.

टरबूज़  हे पिक साधारण २५ ते ३० c  ला व्यवस्थित वाढतें।  तरबूजाची लागवड ही जानेवारीच्या शेवटच्या  आठवड्यात केलि तरी चलते।   मि suger  queen  या वाणची लागवड केलि होती।  १ acre  साठी  साधारण ६ हजार seeds / रोप  लागते  ,सरी  मधील अंतर हे ६ foot  व् रोपमधील अंतर हे किमान शुगर क़्वीन या वैरायटी साटी १.  ते २ फुट पाहिजे।
 शक्यतो बेड तयार करतेवेळी सिंगल सुपर फॉस्फेट एकरी १५० kg,१8:4६:०० ५० kg ,व निंबोळी पेंड दोन बॅग, युरिया ४०kg bed बेडमध्ये टाकावे व नंतर मल्चिंग पेपर फिटिंग करावी.

 मल्चिंग पेपर  टाकूनच  लागवड करणे योग्य असते . लागवड केल्यानंतर तीन दिवसांनी ह्युमिक ऍसिड ५००gm ग्राम ड्रिप मधून देणे.
 ४ ते ५ दिवसांनी १९. १९.. १९. ५kg   acre  ड्रीप ने देणे . 

 त्या नंतर १० ते १२ दिवसांनी १२;६१ ;०० ५ kg   १ acre  ला ड्रीप ने देणे . फळांची लागवड शक्यतो बेड वर राहील असेच बेड बनवावी.

 फळाची सेटिंग सुरु  होताच ०;५२;३४ ५.kg  देणे .   फळाचा आकार ४ kg होई पर्यंत ४ ते ५ दिवसाच्या अंतराने  ० ;५२ . ३४ हे देत राहावे .  पाने  पिवळी पडल्यावर  व  फळाचा गर लाल   झालयावर  ० .५०; ५० देणे .  फळाचा आवाज डब  - डब झाल्यास समजावे कि फळ काढणी साठी तयार आहे . 
  वेलीचा  पाला सुकतो   व   फळ   चमक येति . 

सुरवातीच्या काळात पांढरी माशी व नाग अली चा खूप प्रधुरभाव असतो . 

 पांढरी माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. प्रतिबंध करण्यासाठी 2Ltr गोमुत्र+ 2Ltr
 ताक/15Ltr पाण्यात मिसळून 8-10दिवसाच्या अंतराने दोनदा फवारा.
सफेत माशी ,लाल कोळी, दिसून येताच नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20
 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट
 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6
 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.
नाग अळी


नाग अळी पानांवर सफेद रंगाच्या रेषा ओढते.नियंत्रणासाठी अबामेक्टिन 1.9 EC(अ‍ॅग्री-मेक,व्हर्टीमेक) 6 ml/15 Ltr पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा. शक्यतो फळाच्या सेटिंग नंतर फळ माशी चा जास्त प्रादुर्भाव होतो आ.जिथे कुठे डाग पडला असेल तिथे फळ खराब होते. अशी फळी शक्यतो कडून शेताबाहेर टाकावीत . फळ सेटिंग नंतर 15 ते 20 दिवस शक्यतो फळमाशी वर जास्त लक्ष असू द्यावे.
आळी रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास ampligo,proclem,corogen etc. औषधांचा वापर करावा.
फळ काढणीच्या 15 दिवस अगोदर लाल कोळी या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो त्यामुळे सल्फर 80wp याची फवारणी चांगली चिंब करावी.
किंवा mitigate  

 या औषधांचा वापर करावा.

सूक्ष्म सिंचन
चांगले उत्पादन व वाढीसाठी पिकाला ठिबक मधून 1-2 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस आणि 3-6 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस पाणी परंपरागत पद्धतीद्वारे पाणी द्या.

फळ सेटिंग नंतर पाण्याची गरज जास्त असते. जसजशी फळ मोठे होईल तर त्याचे पाणी प्रमाण जमिनीनुसार वाढवावे.फळ काडण्याच्या अगोदर पाणी सहा ते सात आठ दिवस अगोदर बंद करावे.
ठिबक सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनात 18% वाढ होते व पारंपारिक पद्धती पेक्षा 40% पाण्याची बचत होते.

  साधारण १ एकरी २५० ते ३०० क्विंटल माल  मिळतो , 

दीड  किलोच्या आतील फळाचा शॉर्र्टिंग ,निवड करून प्रतवारी करावी . 

 साधारण किलोला  मार्च ते मे  दरम्यान ९ ते १५ rs  किलोला भाव  मिळतो . रोप लावल्यापासून शुगर क्किन(suger quen) या वानाची तोडणी 60 ते 70 दिवसात सुरू होतील. फळकाढणी जास्त उशीर झाल्यास  फळावर उन्हाचे चटे पडण्यास सरुवात होते फळाची काढणे योग्य वेळेतच करावी.

 टीप .;  सर्व माहिती मी केलेल्या  पिकाच्या शेतीतील अनुभव नुसार आहे ...... 
बाकी हवामान नुसार बदल आपण स्वतः करावा . 

  बाकी  औषदाचि माहिती व वापर expert  ला विचारून करावा .  

टिप्पणी पोस्ट करें

0 टिप्पणियां