Translate

ठीबक सिंचन वर तुर पिक लागवड आनी फायदे,Thibak sinchan Tur lagvad mahiti,

   Thibak sinchan Tur lagvad mahiti 

नमस्कार शेतकरी बंधूंनो तूर हे आपल्या राज्यातील कडधान्यापैकी प्रमुख नगदी कडधान्य पीक आहे .महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेल प्रचलित वाण

दाण्याचा रंग लाल, कालावधी-१५५-१६५ दिवस, उत्पादन १५-१६ क्विं/हे. कालावधी १४५-१६० दिवस, मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम उत्पादन २४-२६ क्विं/हें. दाण्याचा रंग तांबडा, कालावधी १३०-१४० दिवस सलग पेरणी व आंतरपिक पद्धतीत चांगले उत्पादन, उत्पादन २८-३० क्विं/हेतूर हेक्टरी किती बियाण्याची आवश्यकता लागते?


तूर पीक घेतल्यावर आयपीसीएल-८७ वाणाकरिता हेक्टरी १८ ते २० किलो बियाणे लागते. मध्यम मुदतीच्या एकेटी ८८११, विपुला, राजेश्वरी करिता हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते.

राज्यात तुर tur lagvad पिकाखाली जवळपास 11 लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादकता 9.6 क्विंटल प्रति हेक्टर आहे .

आपल्या देशात  पिकाची उत्पादन 22 दशलक्ष टन असून सुद्धा दोन ते तीन दशलक्ष टन डाळी आपण घरगुती गरजा भागवण्यासाठी आयात करत आहोत. याचे प्रमुख कारण म्हणजे आपले डाळीचे मुख्यता तुरीची tur एकरी चार ते पाच क्विंटल उत्पन्न होते .आपली डाळीची गरज वाढवण्यासाठी व भागवण्यासाठी एकरी तुरीची उत्पादकता वाढवणे आपल्याला गरजेचे आहे .

तूर हे पीक पाण्याची अत्यंत संवेदीशील असून जमिनीत ओलावा कमी झाला आणि फुले लागण्याच्या वेळेस उशिरा पाणी दिल्यास तुरीचे मोठ्या प्रमाणावर गळ होते. म्हणजेच तुरीला गरजेनुसार पिकाच्या वाढीनुसार अवस्थेनुसार हवे तेवढे पाणी देणे गरजेचे आहे हे केवळ ठिबक सिंचनामुळेच शक्य होऊ शकते. तुर हे मुख्यतो सोयाबीन कपाशी ज्वारी इत्यादी पिकांमध्ये आंतरपीक म्हणून घेतली जाते अशा परिस्थितीत सध्या विविध फायदे असलेल्या ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून सलग तुर पिक गेल्यास उत्पादनात भरी वाढ होती .तसेच ठिबक मुळे 50 ते 60 टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते पाणी जरी भरपूर असले तरी विजेच्या भरण्यामुळे दिवसात सिंचन शक्य होत नाही त्यामुळे रात्री ठिबक सिंचन पद्धतीने कमी वेळेत अधिक क्षेत्रावर एक समान पाणी देणे शक्य होते.

तूर लागवडीचा हंगाम tur lagvad hangam

तूर लागवडीचा हंगाम कापसा प्रमाणे ठिबक सिंचन पद्धतीवर पिकाची लागवड 25 मे पासून 15 जुलै पर्यंत करता येते. त्यामुळे हुकमी खात्रीशीर विक्रमी उत्पादन घेता येते .

तूर पिकाच्या जाती  विपुला ,राजेश्वरी ,बी एस एम आर 776 या जाती बाजारात उपलब्ध आहेत.

लागवडीचे अंतर व लागवड tur lagvad antar

तुरीचे एक ओळ पद्धतीने लागवड करता येते यामध्ये तुरीच्या दोन ओळीत आठ फूट अंतर ठेवावे तसेच तुरीचे सलग लागवड करता येते.

 सलग लागवड करताना तुरीच्या दोन ओळीतील अंतर पाच ते आठ फूट ठेवावे तर दोन रोपांमधील अंतर 1.25 ते 1.50 फूट ठेवावे तुरीची लागवड वरील अंतरावर बियाणे टोकन पद्धतीने किंवा रोप लावून सुद्धा करता येते. लागवडीच्या वेळेस एका ठिकाणी दोन ते चार बी लावावे व 25 ते 30 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.

तुर पिकावरील ठिबक सिंचनाची मांडणी अशा पद्धतीने करावी.

 तुर पिकासाठी जैन टरबो एक्सल किंवा टरबो  स्लिम ईनलाईन ठीबक पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये 12 ,16 किंवा 20 एम एम ईनलाईन लॅटरल नीवड  करून प्रतिताशी चार लिटर क्षमतेचे ड्रीपर मधील अंतर जमिनीच्या मगदूराप्रमाणे 40 ते 50 सेमी ठेवावे .

आंतरपीके  tur pikatil antarpik

जैन ठिबक संचाच्या साह्याने सलग तुर मुख्य पीक म्हणून घेता येते मध्ये आंतरपीक म्हणून उडीद, सोयाबीन, मका,झेंडू ,ढेमसे, काकडी इत्यादी पिके घेता येतात.

फर्टिगेशन jain irrigation  drip inline

ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा विरघळणाऱ्या खतांच्या वापरण्याच्या संकल्पनेत फर्टिगेशन असे म्हणतात.
 तूर पिकासाठी ही फर्टिगेशन तंत्राचा वापर करणे फायद्याचे आहे.
 नत्रा करता युरिया आणि पोटॅश साठी पांढरा पोटाचा वापर कराव्यात .स्रपुरदसाठी 12: 61:00 खतांचा वापर करता येईल. ठिबक मधून विद्राव्य खते देण्याकरता व्चुहेंचयरी किंवा फर्टिलायझर टॅंक बसवून घ्यावी.

पूर्वमशागत 

जमिनीची चांगली खोल नागरट करून दोन-तीन वखाच्या पाळयात देऊन जमीन संपातळीत आणावी. शेवटच्या वखाराच्या पाळी आदी हेक्टरी पाच ते सहा टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळून घ्यावे व रासायनिक खते खालील प्रमाणे द्यावीत. 

रासायनिक खतांचा वापर

तुर पिकाची विक्री उत्पादन घेण्यासाठी संतुलित खतांचा म्हणजे नत्र स्फुरद पालाश सोबत दुय्यम अन्नघटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे आह
लागवडीवेळी देण्यात येणाऱ्या स्फुरद आणि पाला सोबत मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो ,जिंक सल्फेट पाच, किलो फेरस सल्फेट पाच किलो ,बोरॉन दोन किलो प्रति एकर वापरावेत.

विद्राव्य खतांची फवारणी

सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत 19:19:19 तसेच फुलकळीच्या सुरवातीला 12:61:00 नंतर फुलाच्या व शेंगा वाढीच्या अवस्थेत 00: 52: 34 आणि नंतर दाणे भरण्याच्या अवस्थेत 13 :00:45 खतांचा दोन दोन फवारण्या कराव्यात.


जैन ठिबक द्वारे पाणी व्यवस्थापन

(लिटर/ झाड/ प्रति दिवस लागणारी पाणी)  (lagvad 8×1.25)

तुर ठिबक सिंचनाचे फायदे tur Thibak sinchan
1 ठिबक सिंचन पद्धतीने उत्पादनात भरघोस वाढ होते. 2पाण्याची 50 ते 60% बचत होते .
3तूर पिकाच्या मुळांच्या भागात पाणी व अन्नद्रव्य समानतेने पोहोचते ज्यामुळे रोपांमध्ये पाण्याचे अन्नद्रव्यसचा वापराची क्षमता वाढून अधिक उत्पादन मिळते .
4 फुलकळीत तुरील  गरजेनुसार पाणी देता येते ,फुलगळ कमी होऊन शेंगेतील दाणा वाढतो.
5  ठिबक सिंचन मुळे पाण्याचा ताण बसत नाही व उत्पादनात वाढ होते.
 6 ठिबक सिंचनामुळे मुळांच्या कक्षेत सतत वापसा असतो.
 7कमी वेळेत अधिक पीकाला एक समान पाणी देता येते. 
8 विजेच्या भार नियमात रात्रीचे सिंचन सहज शक्य होते.

तू हे कमी खर्चात अधिकाधिक फायदा देणारे पीक आहे .
तूर पिकाच्या मुळांवर गाठी हवेतील नत्र शोषण जमिनीत स्थिर करून जमिनीचा पोत सुधारतो .
तूर पिकाच्या वाळलेल्या पाला जमिनीत पडून जमिनीची उत्तमरीत्या हयुमास तयार होते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते .तूर हे पीक किडीस व रोगास अधिक बळी पडत नाही.
 मजुरीच्या खर्चात बचत होते .तूर पिकामध्ये कापूस भाजीपाला प्रमाणे मजूर लागत नाहीत. जनावरांसाठी उत्कृष्ट दर्जाचा चारा मिळतो . तुर प्रथिनाचा उत्तम स्रोत आहे.

तुरीचे उत्पादन  tur utpadan
तुरीचे ठिबक सिंचनाद्वारे सिंचन करून योग्य व्स्तव्यवस्थाप केल्यास 25 ते 30 क्विंटल उत्पादन acre मिळू शकते.





कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.