Translate

तैवान पिंक पेरू लागवड, Taiwan pink Peru lagvad mahiti...

  तैवान पिंक पेरू ,lagvad mahiti 

जमीन: पाण्याचा चांगला निचरा होणारी ,मध्यम ते हलका प्रतीची जमीन पेरू लागवडीसाठी योग्य असते.


जाती: तैवान पिंक, vnr ,vnr gold ,vnr red ,sardar l-49 

दाब कलम ,Taiwan pink Peru lagvad 

लागवडीचे अंतर: साधारण गल्लीतील अंतर हे आठ फूट व रोपांतील अंतर हे चार फूट असावे. दोन किलो सुपर फॉस्फेट व मॅलॅथिआन 50 -60 gm पावडर मिसळून खडे भरून लागवड करावी.

पेरूच्या जाती परत्वे रोपांची संख्या एकरी असते. तैवान पिंक या जातीसाठी एकरी 900 ते हजार  संख्या असते व साधारणता दहा ते बारा रुपये प्रमाणे एक रोप मिळते.

खते: पूर्ण वाढ झालेल्या झाडास चार ते पाच पाट्या घमेले शेणखत 900 ग्रॅम नत्र ३०० ग्रॅम स्फुरद व तीनशे ग्रॅम पालाश झाडाला बहार धरण्याचे वेळी द्यावी ,पैकी निम्मी नत्र बहाराच्या वेळीस उरलेले नत्र फळधारणेनंतर द्यावा तर स्फुरद व पालाश एकाच हप्त्यात बहराच्या वेळी द्याव.

पीक संरक्षण: 1_ पिठ्या ढेकण्याच्या नियंत्रणासाठी जैविक व्हरटीसीलीयम 40 ग्रॅम 100 मिलि दुधात मिसळून दहा लिटर पाण्यात फवारावे. Taiwan pink Peru lagvad mahiti 

फळमाशीचे नियंत्रणासाठी संरक्षक सापळ्यांचा वापर करावा.

 2_ मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा पावडर 100 gm/ झाड शेणखतात मिसळून  टाकावे किंवा बोर्ड मिश्रण एक टक्के द्रावणाची मातीत जिरवणी करावी.

 3_ फळावरील डागांसाठी बाविस्टीन 0.1 % + मॅन्कोझेब  0.2% ची फवारणी करावी.

इतर महत्त्वाचे: बागेत फांद्यांची दाटी झाल्यानंतर भरपूर सूर्यप्रकाश व हवा फीर्ती राहण्यासाठी तसेच यंत्राणे मशागत करण्यासाठी हलकी छाटणी केल्या चांगले उत्पादन मिळू शकते. 

 तैवान पिंक  पेरू लागवड 

उन्हाळ्यात फळांचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी 2__4_5 टी 70 पीपीएम या संजीवकांची फवारणी करावी उत्पादन 700 ते 1500 फळे प्रत्येक कलमी झाडापासून मिळतात.

फोम  चा वापर: फोम  चा वापर का करावा? फोमचा वापर केल्याने फळाला ऊन लागत नाही, फळाला इतर रोगांपासून संरक्षण मिळते ,फळाला चकाकी असते, वन्य पक्षांपासून संरक्षण मिळते व साईज वाढण्यास मिळत मिळते.

तैवान पिंक >>>>https://youtube.com/shorts/R9IuDBQIvv0?si=GF4C_RDp2A8p686a

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.