Tomato farming important tips for Indian farmers,टोमॅटो पिकातील काही महत्वपूर्ण टिप्स.

Ticker

6/recent/ticker-posts

Tomato farming important tips for Indian farmers,टोमॅटो पिकातील काही महत्वपूर्ण टिप्स.

Tomato farming important tips for Indian farmers,टोमॅटो पिकातील काही 
महत्वपूर्ण टिप्स

Tomato farming in india
1. झिमझिम पाऊसात बॅकटिरियाल करपा ह्या रोगा पासून संरक्षण करण्यासाठी कॉपर + वॅलीडामायसीन ,रोको , ची फवारणी खूप महत्वाची आहे

2. पीथीयम बुरशी मुळे गळ पडत असल्यास ट्रायकोडर्मा व सुडोमोनास ची आळवणी किंवा ड्रीप ने सोडावे

3. बॅकटिरियाल मर दिसत असल्यास सुडोमोनास व बॅसिलस द्यावे

4. बांधणी च्या आधी पर्यंत कमीतकमी 12 ते 15 किलो कॅल्शियम नायट्रेट एक्स्ट्रा 17/0/0/33%Cao दिलेला खूप चांगला राहील
5. प्लॉट बांधणी च्या वेळे पर्यंत पाऊस असल्यास झाडाची ज्यास्त वाढ होते तेंव्हा 0/48/47 P Booster एकरी तीन किलो व फवारणीतून 500 ग्रॅम देऊ शकता

6. बांधणी च्या वेळेस मायक्रो न्यूट्री फेरस 0/42/47+2.8% Feएकरी 3 किलो दिल्याने  झाडाची वाढ व्यवस्थित होऊन चांगली फुल व फळ धारणा होते

7. फॉस्फोरस युक्त खत जमिनीत खूप लवकर फिक्स होते  परंतु अँटिकॅल्क ग्रेड याला अपवाद आहेत जसे की अँटीकल्क12/61/0 व अँटीकल्क 0/52/34

8. तिरंग्याचा प्रभाव कमी करण्यासाठी फुलधारणे पासून मायक्रो न्यूट्री Fe (फेरस) ची फवारणी 3 ग्राम प्रति लिटर पीएच पाच ते सहा करून घेणे व ड्रीप द्वारे द्यावे  (एकरी  3 किलो )

9. मँग्नीशियम चा वापर सुरवाती पासुनच करावे त्यामुळे बुडातील पाने पिवळे होण्याचा (हळद्या) प्रमाण कमी होते। त्या सोबत इंडिकेम कंपनीचे प्रयान फूड ग्रेड  फॉस्फरिक ऍसिड वापरावे एकरी दोन किलो

10. तिरंगा टाळण्यासाठी लागवडीच्या सुरुवाती पासून कॅल्शियम नायट्रेट एक्स्ट्रा 17/0/0/33%Cao  मॅग्नेशियम सल्फेट , मायक्रो न्युट्री फेरस 0/42/47+2.8%Fe आणि बोरान दर तीन दिवसांच्या अंतराने 10 ते 12 दिवसात दिल्यास पुढील तिरंग्याचा संकट टाळू शकतो किंवा प्रमाण कमी करू शकतो

11. प्लॉट बांधणी झाल्या नंतर लगेच चिकट सापळे व कामगंध सापळे लावा

12. चुनखडी युक्त जमिनी मध्ये अँटीकॅल्क 12/61/0 व अँटीकॅल्क 0/52/34 चा वापर करावा

13. फुलधारणा कमी वाटत आल्यास1 ग्राम बोरान + 1 ग्राम कॅल्शियम नाइट्रेट एक्स्ट्रा ची फवारणी घ्यावी

14. फुलगळ ज्यास्त होत असल्यास फवारणी 
कॅल्शियम नायट्रेट एक्स्ट्रा 17/0/0/33%Cao 1 ग्राम प्रती लिटर व 1 ग्राम बोरॉन व  ड्रीप मधून अँटिकल 12:61.0 सोडावे  समाधानकारक रिजल्ट्स मिळत आहेत

15. फुगवणीच्या कालावधी मध्ये 0/48/47 P Booster 
फॉस्फरस व पोटॅश ड्रीप वाटे  द्या👍🏻

टिप्पणी पोस्ट करें

0 टिप्पणियां