Translate

Liqvid khat niyojan,करा विद्राव्य खतांचे योग्य व्यवस्थापन उत्पन्नात होईल वाढ

 Liqvid  khat niyojan खताचा करा योग्य vapar 

Liqvid खते.mahiti 

 करा विद्राव्य खतांचे योग्य व्यवस्थापन उत्पन्नात होईल वाढ

प्रमुख विद्राव्य खते.


1- 19:19:19 आणि 20:20:20-या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात. हे खाते नत्र अमाईड, अमोली कल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या दोघेही विद्राव्य खतांचा वापर हा प्रामुख्याने पीकवाढीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी दिला जातो.

2- 12:61:0-या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमो निकल स्वरुपातील नत्र कमी असतो. यात पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे अधिक प्रमाण असते. नवीन मुलांच्या तसेच टुमदार शाकीय वाढ, मुळाची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.

3- 0:52:38- या खतास मोनो पोटॅशियम फोस्पेट असे म्हणतात.यात स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेसाठी तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.

4- 13:0:45- या विद्राव्य खतस पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोरा नंतरच्या अवस्थेत आणि पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वाहनासाठी हे खत उपयोगी आहे या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.

5- 0:0:50:18-या खतास पोटॅशिअम सल्फेट म्हणतात. पालाश बरोबरच या खतांमध्ये उपलब्ध स्वरूपातील गंधक ही असते. पक्वतेच्या हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचे नियंत्रण होऊ शकते.या खतामुळे पिक अवर्षण परिस्थितीत तग धरू शकते.

6- 13:40:13- कपाशी पिकासाठी हे खत महत्त्वाचे आहे. कपाशीला पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केली असताफुलगळ थांबून कपाशीची बोंडे वाढणे अन्य पिकात शेंगा ची संख्या वाढते.

7- कॅल्शियम नायट्रेट - मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात थोंबे किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

8- 24:28:0- या खतातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकलस्वरूपातील आहे. शाखीय वाढीच्या तसेच फुलधारणा अवस्थेत याचा वापर करतात.

(आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपला नंबर शेअर करा.)

विद्राव्य खतांची फवारणी

पाण्यात विद्राव्य खतांचा वापर फवारणीसाठी करता येतो. पानांमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांच्या पातळीवर पिकांचे उत्पादन क्षमता ठरते. योग्य उत्पादनासाठी पानांमधील अन्नद्रव्यांची ही पातळी पुरेशी असणे आवश्यक असते. त्यासाठी संतुलित प्रमाणात ही अन्नद्रव्ये पिकास वाढीच्यानिरनिराळ्या वाढीच्या अवस्थेच्यागरजेनुसार मिळणे गरजेचे आहे. शिफारस केलेल्या मात्रेत फवारणी मुळे पिकांची जोमदार वाढ होऊन फळांचे वजन, आकार व प्रतीमध्ये चांगली वाढ होते. साठवणुकीत तसेच निर्यातक्षम उत्पादन राहिल्याने उत्पन्नातही वाढ होते.

फवारणीद्वारे विद्राव्य खते देण्याचा उद्देश

पिकांना उडीप्त करून त्यांची उत्पादन प्रक्रिया वाढवण्याकरितावाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत फवारणी केली असता उत्पादनात वाढ होते. अतिवृष्टीमुळे किंवा सतत पाऊस मान मुळे जमिनीतील खते वाहून जातात. तसेच पाणी साचल्यामुळेमुळे कार्यरत नसतात. अशावेळी काही वेळात पाऊस थांबला असता फवारणी मधुन खते दिल्यास ती पिकांना ताबडतोब उपलब्ध होतात.

जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे सायंकाळी खते दिल्यास पाने टवटवीत होऊन कार्यरत राहतात. पिके अवर्षण परिस्थितीत तग धरू शकतात. कीड रोगामुळे पाने कुरतडली, खाल्ली जातात. पानाची जाळी होते अशावेळी फवारणीतून खते दिली असतानवीन पालवी फुटून पिके कार्यरत होऊ शकतात. फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्याय होऊ शकत नाही. परंतु अचानक निर्माण झालेल्या पानातील पोषण द्रव्यांची कमतरता भरून काढतात. फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फलधारणा, त्यानंतरफळांची वाढहोण्यासाठी जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात.. अशावेळी फवारणीद्वारे दिलेली खते उपयोगी पडतात.

फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यायची काळजी

पाण्यामध्ये खत विरघळावे. खत पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे.

कॅल्शियम जास्त असलेल्या पाण्यात थोडे गरम पाणीकिंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. अशा कॅल्शियम युक्त पाण्यात कीटकनाशके, बुरशीनाशके, खाते वापरण्याचे टाळावे

बोर्डो मिश्रण किंवा लाईम मिक्सर साठवलेला डब्यात द्रावण तयार करू नये.

फवारणी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते साडे सहा या वेळेत करावी.


कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.