Translate

शेतीमधे ऑक्झिन्स,(IAA)- संजीवकांचा वापर कोणत्या पद्धतीने आणि केव्हा करावा?

शेतीमध्ये संजीवकांचा वापर कोणत्या पद्धतीने आणि केव्हा करावा. शक्यतो संजीवकांमध्ये असलेल्या रसायनांवरून त्यांची पाच प्रकार पडतात त्यामध्ये
1" ऑक्झिन्स,(IAA)-- ऑक्झिन्स हे एकमेव निसर्गात आढळून येणारेेे संजीवक आहे.
इंन्डोल 3 असिटिक ऍसिड (IAA) म्हणून ओळखली जातात. तसेच अनेक संजीवके नंतर  आढळून आली.
NAA,IBA या कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या संजीवकांचा वापर शेतीमध्ये खास करून मुळांची निर्मिती (1000___10000ppm)फळधारणा आणि फळांची विरळणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
2_4d ,2,4,5_t  या कृत्रिम तन नाशकांचा वापर रुंद पानांच्या तणांचा नाश करण्यासाठी केला जात आहे.
IAA या संजीवकाचा वापर 10 ते 100 पीपीएम पर्यंत केल्यास अनेक फळ पिकांमध्ये पानांची फळांची गळ थांबते तर या संजीवकाचा वापर २० ते १०० पीपीएम पर्यंत केल्यास काढणीपूर्व फळांची गळ  पिकांमध्ये थांबते .ऑक्झिन्समुळे फळ पिकांमध्ये इथलीनचे प्रमाण वाढते त्यामुळे अननसांमध्ये फळ धरण्याचे प्रमाण वाढते.

एका वर्षात येणाऱ्या फळ पिकांमध्ये नियमितपणे  फळधारणा होण्यासाठी NAA ऑक्झिन्सचा वापर होतो.
अनेक अन्नधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी ऑक्झिन्स या संजीवकाचा नियमित वापर होतो.


कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.