Translate

बटाटा लागवड माहिती व्यवस्थापन,potato 🥔 lagvad

बटाटा लागवड माहिती Potato planting lagvad mahitI

जमिन🥔

बटाटा लागवडीसाठी मध्यम काळी पोयट्याची व निचऱ्याची जमीन योग्य असते.


शेणखत🥔

20 टन शेणखत प्रति एकरी टाकून घ्यावे

सुधारित जाती

कुफरी चन्द्रमुखी, कुफरी लवकर,कुफरी सिंधू ,ज्योती ,पंजाब नंबर 1

लागवडीचा हंगाम

खरीप हंगामासाठी जून -जुलै व रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर- नोव्हेंबर

लागवडीचे अंतर

सऱ्या वरंबे 45 × 30 सेंटीमटर

बियाण्यांचे प्रमाण

600 ते 700 किलो बियाणे acre  लागते.

बीजप्रक्रिया 

*लागवडीपूर्वी बटाट्याची फोडी करतेवेळेस चाकू किंवा वीळा बलायटॉकस 0.3%या औषधाच्या द्रावणात बुडवून घ्यावा.

*लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम+कॅप्टन 30ग्राम द्रावणात बुडवून बटाट्याची लागवड करावी.

बटाटा तणनाशक नियंत्रणासाठी लागवडीनंतर दोन ते तीन दिवसात 200 एम एल ऑक्सीगोल्ड कींवा झरगाॅन वाडा, गोल वाईज यांचा वापर दोन-तीन दिवसातच करावा नंतर करू नये.

रासायनिक खते

लागवडीपूर्वी 50 :30 :60  किलो npk  प्रती एकर लागवडीनंतर एक महिन्यांनी 50kg नत्र खताची मात्रा द्यावी.

90 ते 100 दिवसांत पिकाचा कालावधी असतो.

मावा तुडतुडे आणि पांढरी माशी हे कीटक पानातील रस शोषून घेतात व विषाणू रोगांचा प्रसार देखील करतात यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्‍लोप्रीड 4 मिली किंवा मिथिल डीमेटाॅन 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे व निंबोळी अर्क 4%टक्के किंवा वरती व्हर्टिसिलियमलेकॅनी 40 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारावे.

बटाट्या वरील पाकुळी व आळी शेतातील साठवणूक केलेल्या बटाट्यची नुकसान करतात.

बियाण्याची निवड करताना कीड विरहित बियाणे निवडावे.

बटाट्या करपा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी मॅन्कोझेब 30 ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून लवकर येणारा करपा रोगाची लक्षणे दिसताच फवारणी करावी. उशिरा येणारा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड किंवा mz72 ,30gm या बुरशीनाशकाची रोगाची लक्षणे दिसताच आलटून पालटून फवारणी करावी .

साधारण 20 ते 25 टन एकरी उत्पादन मिळू शकते.





कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.