Translate

bacteria how to use in farming,psb,ksb फायद्याचे मायक्रो ओर्गेनिजमट्रायकोडर्मा (संजिवनी/बायोहर्ज)- एक बुरशी जी इतर बुरशीना खाते

फायद्याचे मायक्रो ओर्गेनिजम
ट्रायकोडर्मा (संजिवनी/बायोहर्ज)- एक बुरशी जी इतर बुरशीना खाते , उपयोग करपा , भुरी , डाऊनि ,जमिनीतून येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

स्युडोमनास(फसलरक्षक/बॅक्टव्हीप) - एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो , उपयोग करपा , भुरी , डाऊनि , जमिनीतून येणाऱ्या बुरशी  करिता  उत्तम .

अँपिलोमयसिंन(मिलगो) -एक बुरशी जी इतर बुरशीना खाते , उपयोग करपा , भुरी सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

बॅसिलस सबटीलस(मिलडाउन) - एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो , उपयोग करपा , डाऊनि , सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशी  करिता  उत्तम .

बॅसिलस थ्यूरेणजेनेसीस कुष्टारकी  - हे अळी ने खाल्ले की तिला तोंडाचा पक्षवात होतो. तीचे खाने बंद होऊन 72 तासात मरते. बाजारात- डायपेल- 8,डेल्फिन, हाॅल्ड,महास्त्र या नावाने उपलब्ध आहे. 

ब्युव्हेरिया ब्रासीना (दमन)- एक बुरशी जी रस शोषक किडीवर जगते ,  आणि त्यांना मारते उपयोग मावा , तुडतूडे , मिली बग , करिता उत्तम .

मेटारायझम अनिसपोली (कालीचक्र) - एक बुरशी जी  अळी वर्गीय किडीवर जगते ,  आणि त्यांना मारते उपयोग सर्व प्रकारची अळी विशेष करून हुमणी अळी .

डीकम्पोजर - तीन जिवाणू जे सडवण्याची प्रक्रिया वेगात करतात बहुउपयोगी .

रायझोबियम (रायझो) -हे जिवाणू द्विदल वर्गिय कडधान्ये तेलबिया यांच्या मुळीवर गाठी करून राहतात व हवातील नायट्रोजन पिकाला उपलब्ध करून देतात. 

अझोटोबॅक्टर (अॅझोटो)व अॅझोस्प्रिलम (अॅझोस्पी)हे जिवाणू एकदल पिकाच्या मुळीजवळ राहून हवेतील नायट्रोजन उपलब्ध करून देतात. 

PSB -(फॉस्पोफीक्स/ फोस्टर/फॉस्पोसीया एच डी) जिवाणू जे स्फुरद उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.
KSB (पोटॅश अॅक्टीवा/पोटॅसीया एच डी) - जिवाणू जे पालाश  उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.


 माईकोरायझा.. (वॅमशक्ती/वैम HD)🌱🌱🌱🌱

माईकोरायझा काय आहे. 

पपई ,केळी,मिरची, *हळद,ऊस,सोयाबीन, कापूस,संत्रा,अद्रक, अश्या पिकाची लागवड करता आहात किंवा केली आहे का?* तर या साठी अतिशय उपयुक्त माईकोरायझा  वापर करा व उत्पादनात वाढ करा

माईकोरायझा बद्दल माहीती घेवु....

 माईकोरायझा  एक उपयुक्त  बुरशी आहे जी मातीपासून पोषक द्रव्ये कॅप्चर करुन व्हॅस्क्युलर झाडांच्या मुळांना प्रवेश करते. हे बुरशी वैज्ञानिकदृष्ट्या सुदृढ आणि खनिज पोषणद्रव्ये मातीपासून थेट यजमान वनस्पतीच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. अंदाजे 80% ज्ञात वनस्पतींच्या प्रजाती, ज्यामध्ये सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या नगदी पिके सोयाबीन, कापुस,ऊस,केळी,पपई हळद,वैगरे आहेत, त्यांच्याशी सुसंगत सहजीवन पद्धतीने जगते.

झाडे आणि माती मधे माईकोरायझा हे परस्पर फायदेशीर भागीदार आहेत.

परंतु दुर्दैवाने, हे फायदेशीर माईकोरायझा  बुरशी मानवनिर्मित लँडस्केपच्या विकासात नष्ट होत चालली आहे, ज्यामुळे या वातावरणातील वनस्पतींना अतीशय संघर्ष करावा लागत आहे. 

माईकोरायझा बुरशी मूळ प्रणालीची वसाहत करते, तंतूंचा एक विशाल नेटवर्क तयार करते. हे बुरशीजन्य पध्दत आर्द्रता टिकवून ठेवते आणि नैसर्गिक मूलद्रव्य  शोषण करण्यासाठी नैसर्गिकरित्या खनिज व पोषक द्रव्ये आणी अनलॉक करणारी शक्तिशाली एन्झाईम प्रणाली तयार करते.
वनस्पतीच्या मुळाशी जोडण्याच्या त्यांच्या अविश्वसनीय क्षमतेमुळे माईकोरायझा सूक्ष्मबुरशी  मुळांच्या  विस्तार झपाट्याने करते व आसपासच्या जमिनीच्या मोठ्या प्रमाणातील पाणी आणि पोषक द्रव्ये षोशन करुन त्यास वनस्पतींच्या मुळात आणते,वनस्पतींची  पोषण आणि वाढ सुधारते. 

 माईकोरायझा  बुरशीजन्य तंतूचे नेटवर्क तयार करुन हे सूक्ष्म तंतु जमिनीत वाढतात आणि  अधिक पोषक द्रव्ये षोशन करुन मुळांना पुरवतात.

 अतिरिक्त पाणी आणि पोषक द्रव्य  वनस्पतींना पुरवून, माईकोरायझा हे वनस्पतींची  प्रतिकारशक्ती आणि आरोग्यासाठी योगदान करते. माईकोरायझा बुरशी मुळे आपन चांगल्या नैसर्गिक जीवनसत्त्व आसलेले पोषकद्रव्ये असलेले अन्न धान्य पीकवु शकतो.,
माईकोरायझा  वनस्पतींच्या मुळाशी मिळताच नवीन शाखा सुरू होताना दीसते त्यामुळे झाडांची काईक वाढ चांगली .
माईकोरायझा सारखी उपयुक्त बुरशीची उत्पत्ती करुन साधारण 100 ग्रॅम (वैम HD) माईकोरायझा = 100000 प्रोपॅगुल्स आहे.

*माईकोरायझा  एक खत आहे का?*

होय माईकोरायझा हे एक फाॕस्फरस युक्त  खतांमधे मोडले जाते कारण ते जमिनीत फाॕस्फरस सोबत पोषक पदार्थ सोडते. माईकोरायझा  बुरशी नैसर्गिक, कमी प्रकाशात खतांचा मेळ घालुन मुळ्या  मजबूत व प्रतिरोधी तसेच निरोगी झाडे तयार  होतात.

माईकोरायझा  उपचारांपासून आम्ही काय अपेक्षा करू शकतो?

1)झाडाची  चांगली  आणि अधिक संतुलित वाढ होते.

2)मातीतील सुक्ष्मद्रव्ये. फाॕस्फरस व पोषक एन्झाईम्स मुळा पर्यंत पोहचविते.

3) फुलं आणि फळ धारणा अधिक मिळते

4) हानीकारक बुरशीची वाढ होउ देत नाही

5) झाड काटक बनते प्रतीकुल हवामानात तग धरुन वाढते

6)पपई मिरची सारख्या पिकाला मर रोग येत नाही

7)पिकाची वाढ झपाट्यात होते

8)उत्पादनात लक्षणीय वाढ होते

तरी शेतकरी बंधुनी माईकोरायझा( वैम HD) बुरशीचा वापर करावा.


 डि-कंपोजर"- विशेष माहिती.*❇

**" डि-कंपोजर"* मध्ये नेमके काय आहे. यात खालील चार मुख्य प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आहेत.
1) Cellulose degrading Bacteria
2) Xylan degrading Bacteria
3) Phosphorus solubilizing Bacteria (PSB)
4) Potash solubilizing Bacteria (KSB)



सर्व सामान्य शेतकरी व माहितगार व्यक्तींना यातील खालचे दोन बॅक्टेरिया *(PSB व KSB)* परिचीत आहेत.
👉 तर आता माहिती घेऊया यातील सर्वात पहिल्या घटकाची म्हणजे 
*Cellulose degrading Bacteria* . 
याच्या नावातच याची अोळख आहे. Cellulose (सेल्युलोज) म्हणजे कुठल्याही सेंद्रीय पदार्थातील मुख्य घटक. याला degrade करणारे म्हणजेच सडवणारे किंवा कुजवणारे सूक्ष्म जीवाणू. म्हणजेच काष्टा पासुन किंवा टाकावू पदार्था पासून कार्बन विलग करणारा जिवाणू. हा जिवाणू औद्योगिक वापरात खुपच मोठ्या प्रमाणात सडवन्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
याच जिवाणू वरूनच या प्रोडक्टचे नाव ठरविण्यात आलें आहे. तेंव्हा सहाजीकच याच जिवाणूची तीव्रता (कावुंट) या कल्चर मध्ये सर्वात जास्त आहे. 
त्यामुळे याचा वापर कीड नियंत्रणासाठी ही करता येते. वेस्ट डि कंपोजर मधिल याच जिवाणूच्या फवारणीने किडींची मेणयुक्त (wax) त्वचा रखरखीत करून त्यांचा उत्कृष्ट परीणाम सोबतच्या साधारण विषाणे (औषधी) मिळवणे सहज शक्य आहे. 
परंतु, पिकास जमीनीतूनही बरेच काही हवे असते, ज्याचा पुरवठा जमीनीतील सेंद्रीय कर्बाच्या विघटनातून होत असतो. यासाठी जमीनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण (आच्छादन किंवा टाकावू पदार्थ) जमिनीत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे आहे. अशा वेगवान विघटकाचा वापर करताना जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी विशेष श्रम घेणेही तितकेच आवश्यक आहे.
👉 आता पाहुया 'डि-कंपोजर' मधिल दुसरा जिवाणू 
*Xylan degrading Bacteria*
आता जाणुन घेवुया Xylan (झायलान) म्हणजे काय?
सेंद्रीय पदार्थातील पेशींच्या आतील आवरणास Xylan असे शास्त्रीय नाव आहे. या आवरणाचे विघटन करणारे सूक्ष्म जीवाणू. 
वरील दोन्ही प्रकारचे काम करणारे सूक्ष्मजीवाणू म्हणजे Pseudomonas, Bacillus, Rhizobium हे आहेत. या मुळे नत्र स्थिरीकरणास चालना मिळते. आछादनातील बायाेमासचे वेगाने 
'डि-कंपोज करुन पिकास मुख्य अन्नद्रव्यांच्या व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा 'डि-कंपोजर करते.
👉 आता पाहुया 'डि-कंपोजर' मधिल तिसरा जिवाणू  *PSB* (Phosphorus solubilizing Bacteria) दाेन अथवा तिन कणांनी बनलेल्या फॉस्फाेरसचे विघटन करुन सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये रुपांतरीत करुन मुळाना देते.
4)*KSB* (Potash solubilizing Bacteria) मातीतील पाेट्याश सुलभतेने घेण्यास मुळाना मदत करते. अशा प्रकारे मुख्य अन्नद्रव्यांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा 'डि-कंपोजर करते. तसेच बुरशी नाशक व किटकनाशक म्हणुनही याचा वापर करु शकताे. या सर्व गुणा मुळेच *डि-कंपोजर* शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत अहे.
*धन्यवाद 👏*

 *व्हर्टिसिलियम लिकानी:*
(वरुणास्त्र)

श्रीलंकेत १८६१ साली कॉफी पिकावर हि बुरशी शास्त्रज्ञांना आढळुन आली, त्यानंतर जावा देशात स्केल (खवले किड) किडीच्या मृत अवशेषांच्या भोवताली पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसुन आली, झिमरमॅन या शास्त्रज्ञाने ह्या बुरशीचे शुध्द (Pure Culture) स्वरुप वाढवुन त्या बुरशीचा किड नियंत्रणासाठी काही उपयोग होवु शकतो का, यासंबधी अधिक संशोधन सुरु केले.
१९३९ साली ब्राझिल मध्ये विगेस ह्या शास्त्रज्ञाने व्हर्टिसिलयम चा वापर कॉफी पिकातील खवले किड नियंत्रणासाठी केला आणि त्यानंतरच ह्या बुरशीला आताचे नाव प्राप्त झाले. व्हर्टिसिलियम लेकॅनी हि बुरशी पिकावरिल विविध किडींच्या
नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. मावा, पिठ्या ढेकूण, फुलकिडे, लेपिडोप्टेरा (अळिवर्गीय)आणि डिप्टेरा (माशीवर्गीय) गटातील इतर किडी, पांढरी माशी तसेच काही सुत्रकृमींच्या विरोधात हि बुरशी कार्य करते. 

हि बुरशी लैंगिक पध्दतीने पुनरुत्पादन करु शकत नाही, अलैंगिक पध्दतीने तयार केले जाणारे कोनिडोस्पोअर्स हे किडीच्या तसेच काही बुरशींच्या नियंत्रणासाठी उयपुक्त ठरतात.

व्हर्टिसिलियम चे कोनिडीयोस्पोअर्स रुजतांना किडीच्या शरिरात घातक आक्रमण करुन तसेच हायड्रोलायटिक एन्झाईम्स स्रवुन प्रवेश मिळवतात. हि बुरशी किडीच्या अंडी-तसेच अळी (निप्फल स्टेज), प्रौढ अवस्था नियंत्रणात आणु शकते, व्हर्टिसिलियम तिच्या मायसेलिम च्या सहाय्याने पानांच्या खालील बाजुस चिटकुन देखिल राहते. किडीला संसर्ग झाल्यानंतर ७ दिवसात किडीच्या शरीराच्या भोवताली तसेच किडीच्या शरीरावर पांढऱ्या पिवळसर रंगाचे कोनिडीया दिसुन येतात. व्हर्टिसिलियम तिच्या मायसेलियम मधुन ब्रासिनोलाईड ह्या सायक्लोडेप्सिपेप्टाईड ह्या गटातील विषारी द्रव स्रवते. तसेच डिपिकोलिनिक अॅसिड, ब्युव्हिरिसिन, डिसिनेडोईक आणि १०- हाड्रॉक्सि ८- डिसिनोईक हे विषारी द्रव देखिल स्रवते, ज्यामुळे किडीच्या शरिरात प्रवेश मिळवणे तसेच किडीचा नायनाट करण्यास मदत मिळते.

व्हर्टिसिलियम काही पिकांच्या पेशींत देखिल आत जावुन राहते, त्यामुळे पिकाच्या नैसर्गिक प्रतिकारक क्षमतेला देखिल चालना मिळते. व्हर्टिसिलियम बुरशी सिस्ट निमॅटोड (Heterodera schachti) च्या अंडी आणि प्रौढ अवस्था देखिल नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरते. ह्या निमॅटोडच्या अंड्यामधे शिरुन हि बुरशी त्यात असणाऱ्या घटकांवर उपजिविका करते. बुरशीला अंडी, तसेच प्रौढ निरॅटोड वर हल्ला करण्यास ६० तास पुरेसे ठरतात, त्यानंतर किडीच्या आत जावुन हि बुरशी त्यातील घटकांवर उपजिविका करुन निमॅटोड चा नायनाट करते. निमॅटोड ची हि प्रजाती प्रामुख्याने सोयाबीन, शुगर बीट, कोबी, फुलकोबी पिकावर आढळुन येते.

व्हर्टिसिलियम च्या कोनिडीया रुजण्यासाठी पाण्याची नितांत गरज भासते, सहसा पाण्याचा पातळ पापुद्रा असल्यास अशा वातावरणात बुरशी चे कोनिडिया किडीवर सहज रित्या रुजु शकतात. बुरशीच्या वाढीसाठी १५ ते ३० डे. से. तापमान योग्य ठरते. बुरशीच्या कार्यक्षमतेसाठी १० ते १३ तास जास्त आर्द्रता असणे गरजेचे असते, व्हर्टिसिलियम, मेटारायझियम, तसेच ईतर उपयुक्त बुरशीच्या कार्यक्षमतेत योग्य तापमान आणि जास्त आद्रता ह्या फार महत्वाच्या ठरतात. सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के असणे हे बुरशीच्या वाढीसाठी पोषक ठरते. ह्या पेक्षा कमी आर्द्रतेत बुरशीची वाढ कमी होते.

व्हर्टिसिलियमचे  उत्पादन करतांना काहीवेळेस जी फरमेंटेशन पध्दत वापरली जाते तसेच काही शेतकरी ज्या फरमेंटेशन पध्दतीचा अवलंब करतात ( शेण, डाळीचे पिठ, गुळ, दही, ताक वै. पदार्थ एकत्र करुन कुजवतात) त्या पध्दतीने वाढविल्यास त्यापासुन मिळणारे कोनिडिया हे किडीस संसर्ग करण्यास सक्षम राहत नाहीत. त्याऐवजी द्रव सतत हलवत राहणे (shaken Liquid) आणि घन पदार्थावर वाढविलेल्या व्हर्टिसिलियम मधुन किडीस संसर्ग होवु शकेल असे कोनिडिया मिळतात.

त्यामुळे विविध बुरशी फरमेंटेशन तंत्रज्ञानाने वाढविण्यापुर्वी हा शास्त्रीय दृष्टीकोण समोर ठेवल्यास मर्यादीत स्रोतांपासुन जास्तीत जास्त लाभ करुन घेता येईल. व्हर्टिसिलियम चे कोनिडीयोस्पोअर्स हे लहान मोठ्या आकाराचे असतात, आकारने लहान असलेले स्पोअर्स हे मावा किडीस संसर्ग करण्यास सक्षम असतात तर आकाराने मोठे असलेले स्पोअर्स हे पांढऱ्या माशीला संसर्ग करण्यास सक्षम असतात.
 

ईग्लंड येथिल ग्रीन हाऊस मध्ये क्रायसॅन्थॅमम पिकावरिल मावा किडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम चा वापर केला असता ३ महिन्यांपर्यंत किडिचे नियंत्रण मिळाले, नियंत्रित वातावरणात शेती असल्याने तेथिल आर्द्रता आणि तापमान नियंत्रित केले जाते, अशा परिस्थीतीत बुरशीची वाढ झपाट्याने होवुन किड नियंत्रणात मदत मिळते. एकदा किडीला संसर्ग झाल्यानंतर तिच्या मृत्युनंतर देखिल त्यातुन कोनिडियोस्पोअर्स हे हवेत पसरतात ज्यामुळे ईतरही किडिना संसर्ग होवुन त्याचा मृत्यु होतो. ग्रीन हाऊस मधिल काकडी आणि टोमॅटो पिकावरिल पांढऱ्या माशीच्या नियंत्रणात देखिल व्हर्टिसिलियम च्या वापरामुळे किडिंचे ९० टक्के नियंत्रण मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञ करतात. किड नियंत्रणाच्या ।कामात जास्तीत जास्त प्रमाणात स्पोअर्स असलेले द्रावण वापरले गरजेचे असते. जितक्या जास्त प्रमाणात स्पोअर्स ची संख्या राहील तितक्या जास्त प्रमाणात नियंत्रण हे चांगल्या प्रकारे मिळते.

2 टिप्‍पणियां:

रविंद्र आहेर ने कहा…

कुठे भेटेल

tecfarming.com(team) ने कहा…

krushi bhandar madhe bhetel ,ksb,psb ..etc .

Blogger द्वारा संचालित.